विज्ञान व गणित प्रयोगशाळा mini science centre कक्षाचे उद्द्घाटन संपन्न

मुखेड :तालुक्यातील राजा दापका येथील संत नामदेव महाराज विद्यालयात अद्यावत केलेली विज्ञान व गणित प्रयोगशाळा (mini science centre ) कक्षाचा उद्द्घाटन सोहळा खालील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी डावकरे असून उद्‌घाटक कलापंढरी संस्था लातूरचे अध्यक्ष बी . पी . सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन करण्यात आले

 

 

तर प्रमुख उपस्थिती कलापंढरी संस्थेचे निरीक्षक मंगेश कुरुडे , कुणाल जोशी(जिल्हा समन्वयक लातूर ) , बालाजी आंभोरे ( जिल्हा समन्वयक नांदेड ) , प्रतिमा कांबळे (समन्वयक डिजीटल व्हॅन ) , प्रियंका शिकारे , विठ्ठल धनवडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनानंतर फीत कापून प्रयोगशाळा कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले . कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल धनवडे तर बी .पी . सुर्यवंशी ,कुणाल जोशी यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले . कार्यकमाचे सूत्रसंचालन सुलिंदर गायकवाड तर आभार प्रदर्शन प्रदिप दापकेकर यांनी केले . कार्यकमात शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते . अध्यक्षीय समारोपाने कार्यकमाची सांगता झाली .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *