फुलवळ ;(धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उध्दव केंद्रे वय २४ वर्षे व पत्नी कोमल नामदेव केंद्रे वय १९ वर्षे या नवविवाहित पती-पत्नीने अवघ्या दोनच महिन्यात स्वतःच्या शेतातील घरातील लोखंडी अंगल ला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे, या हृदयद्रावक घटनेमुळे कळकावाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल ता.२३ एप्रिल २०२४ रोज मंगळवारी रात्रीचे सुमारास कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे व पत्नी कोमल नामदेव केंद्रे यांनी स्वतःचे शेतातील घराचे लोखंडी इंगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली,या घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही बाब कंधार पोलीस स्टेशनला कळताच कंधार चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, पोकॉ. जुन्ने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा करून दोन्ही प्रेत कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शेवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.
आत्महत्याग्रस्त या नवविवाहितांचा विवाह सोहळा मोठ्या आनंदाने गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजेच ता.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या आनंदाने कळकावाडी येथे सोहळा पार पडला होता, हे विशेष.. मयताच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आत्महत्याग्रस्त नामदेव केंद्रे यांचे वडील उद्धव मारुती केंद्रे राहणार कळकावाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करत आहेत.