आधी लगीन लोकशाहीच्या मतदानाचे… कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा येथे नवरदेवाने पहीले केले मतदान आणि नंतर चढला बोहल्यावर

 

कंधार : दि.26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा येथील चि. सचिन नामदेव राठोड व चि. सौ का.शिवानी नामदेव चव्हाण यांचा विवाह सोहळा आज आयोजित केला होता सचिन नामदेव राठोड यांची इच्छा होती

राष्ट्रीय कर्तव्य बजावून विवाह मंडपात येण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार सचिनने प्रथम राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आणि त्यानंतरच विवाह मंडपात विवाहासाठी सज्ज झाला याप्रसंगी श्रीगणवाडी बुथ वरील सर्व कर्मचारी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

नवरदेव नवरदेवाच्या वेशभूषेत प्रथमच बुथवर मतदान करण्यासाठी आल्यानंतर बूथ वरील कर्मचाऱ्यांनी पण त्यांचं स्वागत केलं यातून सचिनने एक संदेश दिला भारतीय नागरिकांनी घराच्या बाहेर पडून प्रत्येकाने आपला हक्क बजावला पाहिजे राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे लोकशाही बळकट झाली पाहिजे,म्हणून त्यांनी आजचा संदेश दिला आणि विनंती केली.की प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडलं पाहिजे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *