नायगाव । प्रतिनिधी
एकीकडे २६ एप्रिल हा लोकसभा मतदानाचा दिवस तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.नायगाव तालुक्यातील चारवाडी येथील नवरदेवाने अगोदर मतदान, नंतर लग्न मंडपात जाण्या अगोदर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला व सर्वांना मतदान करण्याचे आव्हान केले.