SWEEP कार्यक्रमांतर्गत लोहा शहरातील शाळा विद्यालयात मतदान जनजागृती

 

(लोहा : दिगांबर वाघमारे )

SWEEP कार्यक्रमांतर्गत लोहा शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळा नळगे विद्यालय लोहा शिवछत्रपती विद्यालय लोहा संत गाडगे महाराज विद्यालय लोहा व लोहा शहरातील अनेक शाळांनी यात सहभागी घेऊन मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रॅली काढून त्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत घोषणा देण्यात आल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 88-लोहा विधानसभेच्या अरुणा संगेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तहसीलचे तहसीलदार विठ्ठल परळीकर साहेब यांनी सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

 

याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार संजय भोसीकर, रेखा चामनर गटशिक्षणाधिकारी लोहा सतीश व्यवहारे,नोडल अधिकारी तथा केंद्र प्रमुख एन एम वाघमारे ,एम एन घुगे,डी एन मंगनाळे,पत्रकार बांधव सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी निवडणूक समन्वयक धुळगंडे सर व मन्मथ थोटे सर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *