अहमदपूर ,( प्रा भगवान आमलापुरे ) येथील थोडगा रोडवरील पोचम्मा नगरस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विस्तार अधिकारी, शिक्षण, श्री उत्तमराव चिद्रेवार आणि सौ मिनाक्षी उ चिद्रेवार यांच्या ५० व्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि १५ मे २०२४ रोजी अभिष्टचिंतन आणि तुलाभार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास आमंत्रितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे आणि अधुनमधून जीभजोड विनोद सांगत आपल्या अवतीभवती विनोद आणि हास्याची पखरण करीत हलकंफुलकं वातावरण निर्माण करणारे श्री उत्तमराव चिद्रेवार गुरुजी आहेत.त्यांना काव्य, विनोद , शास्त्र आणि हास्याची उत्तम जाण आणि भान आहे.वयाच्या पंचेहात्तरीत सुद्धा त्यांनी आपला हा गुण जपून ठेवला आहे.किंबहुणा प्रसंग आला तर हा गुण अधिकाधिक व्रधिंगत व्हावा यासाठी ते वेळोवेळी प्रामाणिक प्रयत्न करत असतात.
त्यांचा विवाह दि १४ मे १९७४ रोजी झाला.लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि १५ मे 24 रोजी येथील लातूर हायवेस्थित प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन आणि तुलाभार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या आनंदी सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा.हा कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे.तदनंतर दुपारी १२ ते ०४:०० वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.कोणताही आहेर किंवा भेटवस्तू स्विकारल्या जाणार नाहीत.असेही कळवण्यात आले आहे.