Beautifullll selfie… ….. एक सुंदर , रोमॅन्टिक रीॲलीटी .

..पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाहीत कारण आपण त्या गोष्टीकडे चौफेर पहात नाही.. आमच्या ॲक्टींगच्या भाषेत बोलायचं झालं तर स्क्रिप्ट दिसतं पण नॉन स्क्रीप्टेड पार्ट आपण वाचायचा असतो आणि त्यानुसार कॅरॅक्टरचं वर्कींग करायचं असतं.. तसच बऱ्याच ठोंब्यान्मधे काही रसिक असतात जे आपल्याला हेरायचे असतात.. जसं मी काउंसीलींग करताना एखाद्या घटनेचा कसा चौफेर विचार करता येइल हे समोरच्याला सांगते तसच काहीसं.. मनातून उमटलेलं हे अद्भुत असतं आणि त्यातुन समोरच्याला लागलेला अर्थ ही त्याची वैचारिक ताकद असते ..

माझी मैत्रीण नुकतीच म्हणजे दोन महिन्यापूर्वीच प्रेमात पडली .. lv yu.. miss you सुरु असताना त्याला काही दिवसांसाठी बाहेर गावी जावं लागलं .. ती त्याला खूपच मिस करत होती त्यावेळी तिला लक्षात आलं की , ज्या प्लेस ला पहिल्यांदा आम्ही दोघे गेलो होतो तिथे जावं , मस्त हॉट चॉकलेट घ्यावं आणि ती प्लेस त्याने ओळखावी म्हणून त्याला फक्त चॉकलेट ग्लासचा फोटो शेअर करावा.. पहावं त्याला आपली पहिली डेट आठवते का ??.. तिने ग्लासचा फोटो पाठवल्यावर लगेचच त्याचा रिप्ल्याय आला..

Beautifull selfie. तिने तो फोटो २ वेळा चेक केला आणि मनात म्हणाली , हा तर सेल्फी नाही .. तिला राग आला.. तिला वाटलं , हा मिस यु लिहील पण याने तर असं काहीच लिहीलं नाही.. तिला वाईट वाटलं पण तिच्या डोक्यातुन ते काही केल्या जाईना.. काही वेळाने ती मला भेटली तर तिचा प्रफुल्लित चेहरा कोमेजलेला होता .. मी म्हटलं काय झालं गं ??.. तिने तिचा मोबाईल हातात दिला आणि म्हणाली , याचा अर्थ सांग.. हे पुरूष असेच असतात.. याना रोमॅन्टिक होताच येत नाही.. यांना बायकांच्या मनात काय चाललय काहीही कळत नाही अशी तिने खुप बडबड केली..

मी मात्र अनेकदा तो ग्लासचा फोटो पाहिला आणि वेगवेगळ्या ॲंगल ने विचार करु लागले आणि जेव्हा त्या ग्लासकडे पाहून तिच्या फिगरकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की तो त्या ग्लासच्या आकाराची तुलना तिच्या फिगरशी करत होता.. त्या ट्रांसपरंट ग्लासमधे तो तिच्या व्यक्तीमत्वाला न्याहाळत होता.. त्याची प्रेयसी ही त्या ग्लासच्या आकारासारखी स्लीमफीट आहे.. जसा तो ग्लास ट्रांसपरंट होता तशीच तुह्री आतबाहेर स्वच्छ आहेस हे त्याला त्यातून सजेस्ट करायचे होते.. त्या ग्लासला लागलेलं चॉकलेट आणि संपलेला अर्धा ग्लास तो तिला खुप मिस करतोय हे सांगत होता.. तो म्हणत होता , माझा अर्धा ग्लास मी संपवला आता हा उरलेला तुझा आहे आणि गार होण्याआधी ते तु संपव.. माझ्याकडून हे सगळं ऐकताना तिच्या चेहऱ्यावर हळूहळू आनंद येत होता.. Actually she was blushing..तिचे गाल गुलाबी होत होते.. गालावर गुलाबानी रांग लावली होती.. तिचा राग गेला होता.. त्यावेळी कदाचित तो समोर असता तर वेगळा नजराणा मला पहायला मिळाला असता.. कोमेजलेली कळी खुललेली पाहून हातातला मोबाईल बाजूला सारुन मी तिच्याकडे पहात राहिले तितक्यात तिने माझ्याच गालावर किस केला.. कदाचित तिने तिच्या प्रियकराला दिलेला तो किस होता आणि मी??.. मी नक्कीच आनंदी झाले कारण चौफेर विचार करण्याची ताकद आपल्यात आहे आणि त्याचमुळे माझ्या मैत्रीणीच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला आणि माझ्या हातातला फोन घेउन तिने तिच्या प्रियकराला फोन केला आणि एकच वाक्य म्हणाली ,
” सगळेच पुरूष ठोंबे नसतात काही तुझ्यासारखे रोमॅन्टिक पण असतात तसच सगळ्या स्त्रीया माझ्यासारख्या ठोंब्या नसतात काही सोनल सारख्या रसिकही असतात.. ” इव्हाना त्याला जे कळायचं ते तो कळून चुकला होता..

त्याच्याशी बोलताना तिची बदलत चाललेली देहबोली ही या लेखिकेला खुप काही शिकवुन जात होती कारण निरीक्षण करणाराच साहित्यिक होवु शकतो.. प्रेमात पडल्यावर माणूस त्याचा रहात नाही हे अशा वेड्यांकडुन वारंवार समजतं आणि आम्ही प्रेमात न पडताही कायम प्रेमातच असतो.. तापलेल्या भूईवर नभाने गोमूत्र शिंपडावं आणि आम्ही रसिकांनी त्यातील अमृत चाखावं इतके सुंदर विचार फक्त प्रेमीच करु शकतात कारण गोमूत्र ते अमृत या प्रवासात फक्त लेखकच मिठास आणू शकतो.. वाचताना तुम्हाला चॉकलेट ग्लास नजरेसमोर आला का ??..

ग्लासच्या शेपसारखी तिची फिगर डोळ्यासमोर आली का ??,,इतकं कोणी रोमॅन्टिक असतं का ??.. असं वाटलं का ??. तुम्हाला नक्की यातुन काय दिसलं ते कमेंटमधे नक्की लिहा..
कायम प्रेमात रहा ..
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *