कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यात सर्वसाधारण लागवडीलायक क्षेत्र 68300 हेक्टर असून 2024 मध्ये 68300हे वर विविध पिकाचे पेरणी प्रस्तावित आहे यामध्ये खरीप हंगामातील प्रमुख पिके कापूस, सोयाबीन तूर मूग उडीद हळद इत्यादी असून कापूस पिकाची 28655 हेक्टर सोयाबीन 23 हजार 500 हेक्टर तुर 6453 हेक्टर मूग 1600हेकटर उडीद 1200हेक्टर हळद 1800 हेक्टर व इतर कडधान्य व गळीत धान्य चारा पिकांचा समावेश आहे.
. शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करताना अधिकृत शासनमान्य कृषी सेवा केंद्रातूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी .
काही अडचण आल्यास संबंधित गावाचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांनी केले आहे.तसेच
पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी तसेच बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.
सोयाबीन पिकाच्या बाबतीत स्वपरागसिंचित असल्याने प्रत्येक वर्षी नवीन बियाणे घेण्याची आवश्यकता नाही .एक वेळेस नवीन बियाणे खरेदी केल्यानंतर तीन वर्ष तेच घरचे बियाणे वापरता येईल .
घरचे बियाणे स्वच्छ करून त्याची उगण क्षमता तपासून ती 70% च्या वर असेल तर पेरणी करिता वापरावे सोयाबीन पिकाची पेरणी करताना (बीबीएफ ) रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून मूलस्थानी मृद व जलसंधारण झाल्यामुळे पिकाला पावसाच्या खंडामध्ये फायदा होते व वरंबा कायम वापस स्थितीत असल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते . व उत्पन्नामध्ये वाढ होते .