हिमायतनगर – (प्रतिनिधी)
पत्रकार अनिल मादसवार यांची थोरली बहिण सौ. सुलोचनाबाई सुदर्शन सादुलवार हल्ली मुक्काम निजामाबाद यांच अल्पश: आजाराने निधन झाल, मृत्यु समयी त्या ६२ वर्षाच्या होत्या.
सुलोचना सादुलवार ह्या मादसवार परीवारील जेष्ठ कन्या होत्या, सुसंस्कारीत धाडसी महिलेत त्यांची गणना व्हायची, समारंभ कार्यक्रम प्रसंगी पहिला मान त्यांचा असायचा, अनिल मादसवार यांच्या सात बहिणीं पैकी त्या जेष्ठ थोरल्या होत्या, आजारातुन बरे होण्यासाठी त्यांचेवर उपचार सुरू होते, दरम्यान दि. १३ च्या मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांचे निधनाने सादुलवार, मादसवार परीवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचेवर निजामाबाद येथील वैकुंठधाम स्मशानभुमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
त्या पत्रकार अनिल मादसवार यांच्या थोरल्या बहिण, तर पुसद अर्बन बँकेचे शाखाधिकारी राजेश पोराजवार व उपसंपादक गोविंद गोडसेलवार यांच्या मोठ्या (वहिणी) साडीन होत्या.
अंत्यविधीसाठी बुक्काअय्यवार समाजाचे निजामाबाद जिल्हा अध्यक्ष रमेश सादुलवार, नरसय्या सोनाळा, त्रिमलेश, प्रकाश सादुलवार, कुचाद्री अल्लडवार, सुर्यप्रकाश सादुलवार यांचेसह आप्त स्वकियांची उपस्थिती होती.