लोहा –
कोवीड -19 च्या प्रादुर्भावामुळे माहे जून -2020 पासून सुरू होणारे शैक्षणिक सत्र सुरु होऊ शकले नाही. परिणामी शासनाने “शाळा बंद शिक्षण सुरू” उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा व साधनांच्या माध्यामातून अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू करण्याच्या
मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रात ऑनलाईन शिक्षण संवाद कार्यशाळा आयोजित करुन शिक्षकांना प्रशिक्षित करीत आहेत. जि प हायस्कूल कन्या लोहा व गोलेगांव या केंद्रा अंतर्गत शिक्षकांना गुगल मीट च्या माध्यमातून शिक्षण संवाद कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.ज्यामध्ये 189 शिक्षकांनी उत्सुफुर्त सहभाग घेतला.
दरम्यान जिपहा कन्या लोहा केंद्रातील राज्य पुरस्कार प्राप्त, उपक्रमशील शिक्षिका श्रीमती छायाताई बैस चंदेल यांनी शैक्षणिक विडियो निर्मिती बाबत तर जयश्री मुंडे, संतोष अंबेकर विविध संबंधित विषयावर सादरीकरण केले.
ऑनलाईन शिक्षण संवाद कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. रविन्द्र अंबेकर डाएट नांदेड व लोहाचे गट शिक्षण आधिकारी रविन्द्र सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे संपन्न झाले.