फोटोची काटछाट करून सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या त्या व्यक्तीचा कंधार युवक कॉग्रेस तर्फे निषेध


 कंधार ; पुढारी वृत्तसेवा 

राजकीय पुढाऱ्यांचे चेहरे लावून सोशल मिडियावर राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या फोटोची काटछाट करून  व्हायरल केली जात आहे. देशाचे पंतप्रधान यांचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे याचा वृतीचा  कंधार येथे  दि.१३ सप्टेंबर रोजी निषेध कंधार युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला .निषेधा बाबतचे निवेदन कंधार पोलीसात देण्यात आले.असे कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा  शासनाने त्वरीत शोध घेवून सखोल चौकशी करावी व त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष  सतीश नळगे ,सोशल मीडिया प्रमुख  सतीश देवकत्‍ते  अजय मोरे,  बाळासाहेब पवार ,ऋषीकेश बसवंते , स्वप्नील परोडवाड यांच्या उपस्थितीत  कंधार पोलीसात निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *