वाढदिवस माझ्या साहेबांचा मार्गदर्शकाचा… “आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब” लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघ…..

“आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब”

वाढदिवस एक कृतिशील आमदार सर्व युवकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमदार शिंदे साहेब योद्धाचा…

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेबांचा वाढदिवस..

कंधार – लोहा मतदार संघातील लोकप्रिय आमदार म्हणून व सनदी अधिकारी अगदी कमी वयात आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक पूर्ण नांदेड जिल्ह्याला च नाही तर अख्या महाराष्ट्रात दाखविली आहे.

प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या जनतेच्या हक्कासाठी लढण्याची आणि अस्तित्व राखण्यासाठी समाजसेवा व विकास कामे माध्यमातून कष्ट करण्याची धमक दाखवण्याचे गुण शिंदे साहेब मध्ये अगदी निराळेच..

मित्र फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही शिंदे साहेब ना चांगलीच मिळाली अन त्यांनी ते आपल्या राजकीय क्षेत्रात दाखवूनही दिले आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेबांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

किसी मक्सद के लिए खडे हो तो

एक पेड की तरह

गिरे भी तो बीज की तरह,

ताकि दुबारा उगकर

उसी मक्सद के लिए जंग कर सके..

आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र आहे.

शिंदे साहेब आपण ज्यांवर विश्वास ठेवता त्यांच्यासाठी लढाई कधीही थांबवू नका.कारण, आपण आम्हा सर्व तरुण वर्गाचे प्रेरणा स्त्रोत आहात,

आमदार साहेब तुमच्या मनात असलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरून पूर्ण होवोत.
भविष्यात आपले नेतृत्व अधिकच बहरत जाऊन शोषितांच्या,पीडितांच्या कामी येवो एवढीच अपेक्षा.

शिंदे साहेब आपणास या जन्मदिनी रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुकः- आपलाच🙏
*#ओम लाला ठाकुर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *