नांदेड : प्रतिनिधी
ओंकार सुरेश भाग्यवंत यांने UG NEET 2024 परीक्षेत 720 पैकी 643 गुण (मागासवर्गीय संवर्गातून )मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.या परिक्षेत तो देशात 789 वा आला आहे.
ओंकार यांनी या यशासाठी बरीच मेहनत घेतली त्याचे प्राथमिक शिक्षण लिटलस इंग्लीश स्कूल व माध्यमिक शिक्षण पोदार किड्स स्कुल येथे झाले. दहावी परीक्षेत ९२ टक्के सिबीएसई आणि १२ वी ८६ टक्के गुण घेत 2024 मध्ये ही यश संपादन केले.
पहिल्याच प्रयत्नात ओंकार सुरेश भाग्यवंत यांने UG NEET 2024 परीक्षेत 720 पैकी 643 गुण घेऊन एक आदर्श निर्माण केला. RCC नांदेड येथे खाजगी शिकवणी घेतली .
नेहमीच सर्व परीक्षेत टॉप राहण्याची त्याची जिद्द आणि आई वडीला चा आर्शीवाद व गुरुजनां चे योग्य मार्गदर्शन यामुळे मला यश मिळाल्याचे ओंकार यांनी यावेळी सांगितले.
या माझ्या भाच्याच्या यशात माझे मेहुणे सुरेश भाग्यवंत सर आणि बहिण सौ.मिराताई आणि ओंकारच्या गुरुजनांचे मोठे योगदान आहे .
लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि हुशार असलेल्या ओंकार चे यश आमच्या परिवारासाठी निश्चितच बळ देणारे आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी ओंकार सुरेश भाग्यवंत यांच्या यशाबद्दल दिली.