(कंधार ; प्रतिनिधी )
कंधार च्या मुस्लिम समाजाला अल्पसंख्यांक निधीमधुन , खासदार निधी मधुन कब्रस्तान ला कम्पाऊंड वॉल ,शादिखाना ,नवीन अंगणवाडी यासह विविध कामासाठी आज दि.१४ रोजी कंधार येथे लातूर लोकसभा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना मुस्लिम समाजाच्या वतीने एमआयएम तालुकाध्यक्ष कंधार मो. हमेदुद्दीन अहेमदौद्दीन ,बब्बू भाई, मियां भाई मकसूद,इसूफ भाई, यांनी निवेदन दिले .
कंधार पानभोसी रोड कंधार येथील कब्रस्तानची नोंद सर्वे नं. १ मधील महाराष्ट्र शासन राजपत्र १९७५ अ.क्रं. १९७ पाट अ वर आलेली आहे. सदरील कब्रस्तानला वॉल कम्पाऊंड नसल्यामुळे कब्रस्तान मध्ये जनावरे मोकाट फिरत आहेत. तसेच कंधार शहरा मध्ये मुस्लिम समाजाला लग्नाचे कार्यक्रम करण्यासाठी एकही शादिखाना नाही त्यामुळे आपल्या निधी मधुन मुस्लिम शादिखाना बांधुन दयावे. तसेच कंधार शहरा मध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे नविन चार अंगणवाडयाची आवश्यकता आहे.
ती मागणी जिल्हा बालविकास अधिकारी यांचेकडे केली होती परंतु आज पर्यंत चार अंगणवाड्या नविन आले नाहीत. त्यामुळे कंधार शहरामध्ये चार नविन अंगणवाडयासाठी आपण लोकसभे मध्ये प्रश्न मांडुन पाठपुरावा करुन मंजुर करुन देण्यात यावे अशी मागणी नवनिर्वाचि त खासदार डॉ डॉ. शिवाजी काळगे यांना कंधार च्या मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.