कंधार ; आगामी विधानसभा निवडणूका लवकरच लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने लोहा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांनी कंधार येथील पक्ष कार्यालयात दिली.
दि.१८ जुन रोजी बसस्टॅण्ड जवळ कंधार येथील पक्ष कार्यालयात सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदे चे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम महाविकास आघाडी च्या उमेदवारांना झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने महाराष्ट्रात निवडूण दिले त्याबदल मित्रपक्ष म्हणून मतदारांचे जाहीर आभार मानले.
त्यावेळी ते बोलतांना सांगितले की गेल्या 3८ वर्षापासून शिवसेनेत व २९ वर्षापासून शिवा संघटनेच्या माध्यमातून राज्यात ,देशात विदेशात मोठ्या प्रमाणात सामाजीक कार्य केले . राजकीय वारसा नसल्यामुळे पक्षात दुय्यम स्थान मिळाले. होणारी घुसमट दुर करण्यासाठी २८ जानेवारी रोजी नविन पक्ष स्थापन करण्याचे ठरवले . शिवाजन पार्टी असे नाव घोषीत केले परंतू तांत्रिक अडचणी आणि कोर्टाच्या सुचनेनुसार सेवा जनशक्ती पार्टी ची स्थापना केली. सर्वप्रथम लोहा मार्केट कमीटी ची निवडणूक लढवली व विजय मिळवला. आदरणीय शरद पवार यांच्याशी चर्चा करून भुमिका स्पष्ट केले होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या मोठ्या प्रमाणात सर्वांच्या प्रयत्नाने यश मिळाले .
आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टी च्या वतीने लोहा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. यावेळी सेवा जनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.