उत्तम वाचक हे लेखकाला मिळालेले धन

काल रात्री साडेनउच्या आसपास अननोन नंबरवरुन फोन होता त्यामुळे मी तो उचलला नाही.. मीनीटभराने पुन्हां फोन आला.. त्यावर नाव चैतन्य असं आलं.. कोण आहे बघु म्हणुन फोन घेतला.. समोरून आवाज आला , तुमचं कुरीयर आहे.. मी मनात विचार केला इतक्या उशीरा कोण कुरीयर घेउन आलं.. मी त्याला म्हटलं , त्यावर नाव काय आहे ??.. तो म्हणाला , सोनल गोडबोले.. मी तर काही ऑर्डर केलं नव्हतं मग मला कोणी काय पाठवलं म्हणुन उत्सुकतेने आणि उत्साहाने गेट उघडलं.. साधारणपणे २५ शीतील मुलगा होता.. त्याच्या हातात मोठा लिफाफा होता तो मी घेतला आणि कृतज्ञता व्यक्त करुन गेट लावून घरात आले.. लगेचच पुन्हा फोन वाजला म्हणुन फोन उचलताना जाणवलं की त्याच मुलाने पुन्हां फोन केलाय.. मॅम सॉरी मी तुम्हाला पुन्हा फोन केलाय पण एक विचारायचे होते .. विचारु का ??.. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला , सोनल गोडबोले म्हणजे तुम्ही लेखिका आहेत त्या का ??.. मी हो म्हटलं .. अहो मॅम , मी म्हटलं , काय झालं ??.. बरं झालं मी पार्टटाईम कुरीयर नेउन देण्याचा जॉब करतो .. मला काही कळेना .. मी म्हटलं , म्हणजे ??.. त्यावर तो म्हणाला , मी इथे म्हणजे पुण्यात शिकतोय आणि शिकत असताना नोकरी करतोय पण ती वेगळी नोकरी असती
तर मला तुम्हाला भेटता आलं नसतं.. हे वाक्य ऐकुन नक्कीच आनंद झाला .. त्याला म्हटलं , मी कोणी ग्रेट नाही आणि वेगळीही नाही.. त्यावर तो म्हणाला , मी तुमचा फॉलोवर आहे आणि आवर्जून रोज तुमची आर्टीकल्स वाचतो.. त्यातून प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते आणि लैगिकतेवरचे व्हीडीओ तर आमच्यासाठी उत्तम गाईड आहे.. मॅम तुमची अशी भेट हे माझ्यासाठी सरप्राईज होते.. मी फोन ठेवला आणि लिफाफा उघडला तर त्यात एक सुंदर पेंटींग होतं.. जे एका प्रदर्शनात मला आवडलं होतं.. वैष्णवी नावाच्या मुलीने ते मला पाठवलं होतं.. त्या सुंदर कलाकृतीकडे मी पहात असताना जाणवलं कलाकाराच्या हातात नक्की काय असेल ना ??.. मी शब्दांशी खेळते तसे ते रंगांशी खेळतात.. कला सगळ्याकडे नसतात.. ज्यांच्याकडे आहेत ते भाग्यवान..
माझा प्रत्येक वाचक हा माझ्यासाठी प्राण आहे.. आणि असे वाचक मिळायलाही खुप भाग्य लागतं.. हॉट चॉकलेट पिताना मी एक रिल केलं होतं त्यावर माझ्या चाहत्याने एक चारोळी लिहुन पाठवली होती..
चॉकलेटचा थेंब होवुन
रेंगाळावं वाटतय तुझ्या ओठावर
तुझी खट्याळ जीभ त्यावर फिरेल
त्यापेक्षां शब्द होवुन बसावं तुझ्या लेखणीवर
उद्या मी लिहीले नाही तरी दुनिया सुरूच रहाणार आहे पण वाचक , चाहते यांच्याकडुन मिळालेल्या अशा प्रेमावर अनेक जन्म ओवाळून टाकता येतील इतकी त्यात ताकद आहे.. किती जन्माची आपली पुण्याई असते माहीत नाही पण कृतज्ञतेत खुप मोठी ताकद आहे हे मात्र नक्की.. सदैव तुमच्या ऋणात राहिन..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *