इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

 

नांदेड दि. 24 :-जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत 17 जून 2024 होती. आता आवेदन पत्र सादर करण्याची विलंब शुल्काची निर्धारित मुदत संपल्यानंतर अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारून आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रु. 50 प्रतिदिन प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आहे. सोमवार 24 जून ते 1 जुलै 2024 असा आहे. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत प्रतिदिन 100 रुपये प्रतिविद्यार्थी असून मंगळवार 2 जुलै ते 8 जुलै 2024 पर्यत आहे. अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी याप्रमाणे असून मंगळवार 9 जुलै ते सोमवार 15 जुलै 2024 पर्यत आहे. आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची प्रिंट आऊट व आवेदनपत्र जमा करण्याच्या दिवसांपर्यतचे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अति विशेष अतिविलंब शुल्क घेण्यात यावे. हे शुल्क मंडळाकडे प्राप्त झाल्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

प्रचलि‍त पध्दतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहित प्रपत्रासह पाठविण्यात यावे. तसेच अतिविलंब/विशेष अतिविलंब/अति विशेष अति विलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारावी.

अशा विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ निश्चित करेल त्याच परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल. तसेच त्याचा निकाल इतर विद्यार्थ्यांबरोबर जाहीर होवू शकला नाही तरी विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकनार नाही असे विद्यार्थ्याकडून हमीपत्र घेण्यात यावे. ही बाब माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना सूचित करावी .

राज्य मंडळ कार्यालयाकडून अतिविलंब /विशेष अतिविलंब /अति विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची मंजुरी 15 जुलै 2024 पर्यत घेण्यात यावी. तसेच राज्यमंडळ कार्यालयाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मान्यता देणे शक्य होईल अशा बेताने आवेनदन पत्रांचे तक्ते राज्यमंडळाकडे सादर करावेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *