जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा त्या गोष्टीवर बोध सुरू होतो. मग पुढे हळू हळू समोर जात असताना काही प्रसंग आडवे येतात तर काही प्रसंग मोकळे होतात. जेव्हा कधी अडचणीची वाटचाल सुरू होते तेव्हा मात्र आपल्या हिताचे आपल्या आनंदाचे सर्व मार्ग बंद होतात आपण कुठल्या रस्त्याने प्रवास करतोय हे आपल्याला कळायला सुध्दा तयार नसते.
जरी आपल्याला कळत नसेल तरी तो रस्ता कधीच सोडायचा नसतो त्याचं कारण आपल्या मनातील जिद्द. ती जिद्द सिद्ध करण्यासाठी कुठेच थकायचं नाही. जरी चालता चालता थकलो असेल तरी पुढचं पाऊल टाकायलाच हवं. पुढचा प्रवास जरी खडतर असेल तरीसुद्धा तो आपल्या हिमती पुढे टिकत नाही आणि आपला निर्णय तिथे मात्र चुकत नाही.
हा झाला प्रवास चालण्याचा पुढे माणसं चालत असताना सोबत असली तर तिथं हितगुजाच्या गोष्टी तयार होतात कोणी म्हणतो मला या जगात एवढा मोठा व्यक्ती बनायचं की, पाहणारे माझ्याकडे पाहतच राहावे जळणारे माझ्याकडे पाहून जळतच राहावे या जगाशी मला काहीही घेणं देणं नाही. “मै बडा तो मेरे पीछे सरकार भी खडा” अशी या जगामध्ये माणसं भेटतात.
बोलत बोलत तुम्ही म्हणाला होतात तुम्हाला काहीतरी शोधायचे, नेमकं मला काय शोधायचे हे मलाच कळत नव्हतं अनेकांनी विचारलं तुम्ही काही शोधताय धन, दौलत,बंगला, गाडी हे तर नाही ना परंतु ह्या सगळ्या गोष्टी वर मला त्यांना नकार द्यावा लागला कारण मी जे काही शोधत होतो ते मला भेटत नव्हते नेमकं मी काय शोधत असेल, पुन्हा पुन्हा माझ्या मनाला सांगत होतो.
मन म्हणायचं तू मन लावूनच शोध म्हणजे तुला ते सापडायला वेळ लागणार नाही तसंच जीवनात चढ-उतार सुख आणि दुःखाची पेरणी कोण करतो तर त्याच्यावर येणारी परिस्थिती जरी परिस्थिती त्याच्यावरती वेळ आणत असेल सुख आणि दुःख हा मानवी जीवनात पेरलेलं हे रोपट आहे त्याला वाढवायचं का नष्ट करायचं हे मानवाच्याच हातामध्ये आहे.
जर एखाद्याला दुःख जास्त झालं तर त्यांनी सुखाचे रोपट लावावं आणि जर सुख जास्त झालं तर ते सुख अनेकांना वाटून देण्याचं काम करावं ते जर केलं तर रोपट आपल्या जगण्याला अधिकाधिक आनंददायी बनवता येईल आणि त्या रोपट्यातून होणारा अनेकांना फायदा त्याचे सर्व हक्क तुम्हालाच मिळतील यात काही शंकाच नाही.
जेव्हा माणूस सुखाकडे वळतोय तेव्हा एक तर माणसाला वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी त्याच्या मनामध्ये नेहमीच खेळत असतात जर का आपल्याला ज्या गोष्टी आपल्या मनात कळतात त्या गोष्टी अनेकांना किती धोकादायक किंवा सुखदायक ठरू शकतील या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला विचार करून त्या गोष्टी अस्तित्वात आणायच्या असतात.
हे सर्व मानवाच्या कल्याणासाठी आहे असे ज्याचे विचार आहेत त्यांना माझा प्रणाम. कल्याण कोणाचं करायचं असत. अज्ञानाकडून – सूज्ञानाकडे, अनम्रतेकडून – नम्रतेकडे घेऊन जावे. ज्यांच्याकडे नम्रता आहे त्यांना मानवाच्या कल्याणाचा जयजकार करण्यासाठी उपयोगात आणावं जर या गोष्टी प्रत्येकाला कळाल्या तर नक्कीच मनुष्य समाधानी राहू शकतो. परंतु एवढं काही कळूनही अजून सुद्धा मला यापुढे काहीतरी शोधायचं आहे.
लेखक:
युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड
मो. 7507161537