नॅक मुल्यांकनावर कार्यशाळा संपन्न

 

 

धर्मापुरी येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 3 जुलै 24 रोजी सकाळी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी नॅक मुल्यांकनावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत नॅक मुल्यांकनावर विशेषतः नवीन गाईड लाइन्सवर तज्ञ प्राचार्य डॉ एन एस धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची प्रमुख उपस्थिती होती.ही कार्यशाळा सकाळच्या सत्रात अडीच तास चालली.सुत्रसंचालन डॉ देशमुख पी डी यांनी केले तर प्रास्ताविक डॉ शिंदे एस वाय यांनी केले.आभार प्रा भगवान आमलापुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *