स्व. वसंतराव नाईक यांनी ग्रामीण महाराष्ट्रात साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सूत गिरण्यांचे जाळे निर्माण करून कृषी क्षेत्राचा विस्तार केला. राज्याच्या निर्मितीनंतर त्याला प्रगतीच्या दिशेने नेताना त्यांनी शेतीच्या विकासाचा ध्यास घेतला. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक: 01 जुलै 2024 रोजी. समितीचे कनिष्ठ लिपिक श्री. विठ्ठल आडे यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून जात पडताळणी कार्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, सुंडगे, विठ्ठल जाधव, आनेराये, राठोड, आकले, जाधव, चौडेकर, सुनीता मुंडकर यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.