एक विचार…

एक विचार इतकं काही करु शकतो ??
दिवसाच्या २४ तासात आपल्या मनात असंख्य विचार येतात.. आपण सोशल मिडीयावर राहून हजारो मेसेजेस वाचतो.. त्यात बऱ्याचदा वाईटच बातम्या असतात.. बऱ्याचदा नकारात्मक विचार असतात .. आपण वाचतो आणि धाडकन शेअरही करतो.. कधीकधी आपण स्वतः असे व्हीडीओज बनवतो आणि शेअर करतो किवा स्वतः नकारात्मक ऊर्जा घेउन फिरताना इतराना ती निगेटीव्हीटी पासऑन करत असतो .. आपण नकळत आपली वाईट कर्मे कशी तयार करत असतो..यासबंधीची काही उदाहरणे पाहुयात..

एखादी व्यक्ती स्वतः मांसाहार करत नाही किवा मद्यपान करत नाही पण मित्रांना खाऊ घालते किवा त्यांनी खाल्लेल्या मांसाहार किवा प्यायलेल्या मद्यपानाची बिलं ती देते म्हणजेच काय त्याची लक्ष्मी तो चुकीच्या गोष्टीसाठी वापरतो .. आणि दुसरं म्हणजे प्राणी मारुन खाण्याचं पाप जितकं त्या मारणाऱ्याला लागतं तितकच ते खाणाऱ्याला आणि खाऊ घालणाऱ्यालाही लागतं.. खरं तर अशा गोष्टीचा आपण कधी विचारही करत नाही आणि नकळत झालं तरीही ते कर्म साठणारच आहे आणि त्याचं बंधन हे लागणारच आहे…
एखादी मेसेज तयार करणारी व्यक्ती जर नकारात्मक मेसेज तयार करत असेल आणि ती ५ जणाना पाठवत असेल तर ते पाच जण १०० लोकांना पाठवतात.. ते १०० जण ५०० लोकांना पाठवतात तिथून पुढे लाखो लोकांना तो मेसेज जातो म्हणजेच काय ज्या व्यक्तीने तो मेसेज केलाय त्याचं कर्म तयार झालच पण इतरांनाही त्याने कर्मबंधनात अडकवलं.. काही नकारात्मक मेसेज न ओपन करता डीलीट कराआणि सकारात्मक विचार देणाऱ्या गोष्टीना जवळ करा.. सकाळी सकाळी सुप्रभात लिहून त्यावर सुंदर चार ओळी लिहीणारा मेसेज जेव्हा लाखो लोकांपर्यंत जातो तेव्हा ज्या व्यक्तीने तो लिहीलाय त्या व्यक्तीला लाखो लोकांच्य चेहऱ्यावर आनंद आणल्याचं पुण्य लागतं.. आपण सहज चेष्टा मस्करीत केलेला मेसेज सुध्दा आत्म्यात रेकॉर्ड होतो आणि कर्म साठायला सुरुवात होते..

माझा एक बिल्डर मित्र आहे.. जो स्वतः आणि घरातील कोणीही कधीही ड्रींक करत नाहीत पण सगळ्याची बिले मात्र तो देतो.. त्याला वाटतं आपण मांसाहार खाऊ घालून किवा ड्रींकची बिलं देउन पुण्य केलं तर तसं अजिबात नाही.. काही वेळा दया येउन भिकाऱ्याना आपण पैसे देतो आणि ते पैसे त्यांनी जुगार किवा दारुसाठी वापरले तर त्याचं कर्म आपल्यालाही लागतं म्हणुन शक्यतो खायला द्यावं. पैसे देउ नयेत.. कर्माचा सिध्दांत , लॉ ऑफ ॲट्रॅक्षन जरुर वाचा.. प्रत्येक कृती आणि प्रत्येक शब्द ब्रह्मांडात सेव्ह होतो आणि तो समोर धडकुन त्याच फोर्स ने आपल्याकडे परत येतो..

म्हणुन चांगलच पेरा.. चांगलच उगवेल.. चांगलं वाचा.. चांगलं शेअर करा.. कुठेही कारण नसताना व्यक्त होवु नका.. वाईट वागणं सोप्पं आहे .. चांगलं वागायला खुप मोठी ताकद लागते . ..आपल्याकडे असलेली संपत्ती ,पैसा , ताकद , मान , ऐश्वर्य , बुध्दी , सौंदर्य याचा उपयोग चांगल्याच गोष्टीसाठी व्हायला हवा.. घरात कायम चांगलं बोला.. मुलांसमोर एकमेकांच्या चुका किवा कमतरता यावर न बोलता असलेल्या उत्तम गोष्टीवर चर्चा करा..
हरे कृष्णराधे राधे..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *