कंधार;
कंधार तालुक्यातील लोकमत ग्रामीण पत्रकार गोविंद शिंदे बारूळकर यांना यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ उमरी यांच्या वतीने पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार राजाचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे
कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील मानार प्रकल्पाचा पाणी प्रश्न ,ढगफुटीत झालेल्या शेतकऱ्यांना न्याय, रस्त्याचे प्रश्न या विविध समस्या आपल्या पत्रकाच्या माध्यमातून वाचा फोडून शेतकरी नागरिकांना न्याय दिला त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले .
यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा दिगंबर पाटील कदम माजी कार्यकारी अभियंता अरुण पाटील उद्योजक जगन्नाथ चक्रावार माजी सभापती शांतेश्वर पाटील पत्रकार बबलू शेख मधुकर अंतापुरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी त्यांच्या या पुरस्काराबद्दल व त्यांच्या केलेल्या कामाबद्दल कौतुक व शुभेच्छा देण्यात येत आहे