विकास पवार यांच्या ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकाची रेकॉर्ड बुक मध्ये नोंद

 

प्रतिनिधी
भंडारदरा / राजूर येथील विकास पवार यांच्या मूळ मराठी पुस्तकावरून अनुवादीत झालेल्या ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ मधून भंडारदरा धरणाचा इतिहास उलगडला आहे. एखाद्या धरणाच्या सुरुवातीपासून सद्य स्थितीपर्यंतचा इतिहास मांडणारे हे एकमेव पुस्तक ठरले असून याची विक्रमांच्या जागतिक स्तरावर विविध विक्रमांची नोंद ठेवणार्‍या इमिका बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमांच्या पुस्तकात नोंद करण्यात आली आहे.
‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकात धरणाचे बांधकाम सुरू केल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्याची निवडक ७० छायाचित्रे देण्यात आली आहेत. बांधकामाच्या सुरुवातीपासून ते १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन अधिकारी लेस्लि विल्सन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले, त्यावेळेपर्यंतच्या या फोटोमुळे धरणाच्या बांधकामाचा इतिहास डोळ्यासमोर स्पष्टपणे उभे राहतो.
भंडारदरा धरण म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येतो अम्ब्रेला फॉल, उंच दरवाजांतून वेगाने वेगाने बाहेर पडणारे पाणी, तसेच समुद्राप्रमाणेच नजर पोहचेल तोपर्यंत पाणीच पाणी…. या धरणाची वाटचाल ही शतकपूर्तीकडे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजूर येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचलित आश्रम शाळेतील कर्मचारी विकास मुरलीधर पवार यांनी ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकातून धरणाच्या जागेच्या शोधापासून ते उद्घाटनापर्यंतचा तसेच आजच्या तारखेपर्यंतचा अद्ययावत इतिहास मांडला आहे. विकास पवार यांनी ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ हे पुस्तक मराठीतून लिहिले असून त्याचा इंग्रजीतून अनुवाद प्रा. शिवनाथ तक्ते यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर येथील प्रथितयश संपादक – मुद्रक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी भाग्योदय पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर यांनी सदर पुस्तक मराठी आवृत्तीप्रमाणेच इंग्रजीतूनही अनुवाद वाचकांनादेखील उपलब्ध करून दिला आहे.
‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकाची प्रत इंग्लंडमध्ये राजघराण्याकडे पाठविण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण हे निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आले. पुस्तकात आदिवासी भागातील निसर्ग सौंदर्यापासून ते धरण पूर्ण होईपर्यंतची छायाचित्रे असल्याने ते अधिक आकर्षक झाले आहे. धरण निर्मितीसाठी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ – २ यांनी मान्यता देताना त्यांच्या अभियंत्यांनी केलेल्या धरण बांधकामाचा १८ व्या शतकापासून ते १९२६ साला पर्यंतचा इतिहास सांगितला आहे. त्याकाळी पडणारा दुष्काळ, डेक्कन रॉयटर्स कमिशन, ब्रिटीशांनी परिसरात बांधलेले रस्ते, पूल यांचीही माहिती आहे. धरणामुळे लाभक्षेत्रात झालेले परिवर्तन एच. एच. बिल यांनी शोधलेली जागा, बांधकाम अभियंता अर्थर हिल यांनी केलेले काम, तेथे प्रथमच आलेला टेलीफोन, पोस्ट कार्यालय, बांधकामासाठी वापरली गेलेली त्या काळात आधुनिक मानली जाणारी यंत्रे यांसह विविध माहिती ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकात देण्यात आली आहे आणि म्हणूनच हे अशा प्रकारचे एक आगळे-वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक ठरल्यामुळे त्याची नोंद इमिका बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आले आहे अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकाचे मूळ मराठी लेखक विकास पवार आणि इंग्रजी अनुवादक अनुवाद प्रा. शिवनाथ तक्ते यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *