शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करुन माजी केंद्रप्रमुख एन.एम.वाघमारे यांचा वाढदिवस साजरा

 

(कंधार : प्रतिनिधी )

जि प प्रा शाळा बाचोटीतांडा येथील मुख्याध्यापक तथा माजी केंद्रप्रमुख,मंगलसांगवी एन.एम.वाघमारे यांचा 54 वा वाढदिवस जि प प्रा शाळा बाचोटीतांडा येथे दि. ५ जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साईनाथ विठ्ठलनाथ विद्यालय,मंगलसांगवी या संस्थेचे सचिव डॉ साहेबराव मंगलसांगवीकर तर प्रमुख पाहुणे शा व्य स अध्यक्ष श्री प्रदिप आडे होते.

सर्व प्रथम वाढदिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थींना वही,पेन व खाऊचे वाटप करुन एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संकुल मंगलसांगवी अंतर्गत मुख्याध्यापक श्री डि एस सोनकांबळे,केंद्रीय मुख्याध्यापक श्री शेख मुसा,नांदेड सहकारी पतपेढीचे माजी संचालक विजय पल्लेवाड,सहकारी पतपेढी नांदेडचे विद्यमान संचालक हानमंत जोगपेटे,

 

 

यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्थेचे संचालक धोंडिबा पांडागळे,बामणीचे मुख्याध्यापक मदन घुगे,भंडारकुमठ्याच्या वाडीचे मुख्याध्यापक श्री शिवाजी डिंकळे,आलेगावचे मुख्याध्यापक हानमंत गायकवाड,साईनाथ विद्यालय येथील स शि दिलीप गायकवाड,नंदनवन येथील स शि राजेश चिलकावार,गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश चव्हाण,दत्ता राठोड व इतर नागरिक उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *