*बिलोली तालुका सकल मराठा संघाचा ईशारा..
बिलोली नागोराव कुडके (प्रतिनिधी)
राज्यात शिक्षण व नौकर भर्तीसाठी मराठा समाजाला लागु करण्यात आलेल्या आरक्षणास मा.सर्वोच्च न्यायालयाने नुकतच दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आसुन ती स्थगिती तात्काळ उठवावी अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्याचा ईशारा आज सोमवार दि.१४ सप्टेंबर रोजी सकल मराठा संघ तालुका बिलोलीच्या वतिने मुख्यमंञ्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
राज्य व केंद्र सरकारने चिफ जस्टीस आँफ इंडीया यांच्याकडे आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी तात्काळ मागणी करावी तसेच तामिळनाडुसह अन्य राज्याच्या धर्तिनुसार संसदेत घटना दुरुस्ती कायदा करावा ,शिक्षणातील प्रवेश पाञ विद्यार्थ्यांची फिस माफ करावी, अण्णा साहेब पाटील अर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द कराव्यात,जिल्ह्यातील मराठा मुला -मुलीचे शासकिय वस्तीगृह चालु करावे , आरक्षण मागणीच्या चळवळीतील हुतात्म्यांच्या कुंटुबियाना २० लाख रु.आर्थिक मदत करावी ,आरक्षण स्थगिती उठे पर्यत नौकर भर्ती करु नये ,आशा विविध मागण्याचे निवेदन आज सोमवार दि.१४ सप्टेंबर रोजी तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आसुन राज्य व केंद्र सरकारनी तात्काळ स्थगिती उठवण्यासाठी योग्य ती ठोस पावल उचलावी अन्यथा तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने तिव्र अंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी प्रा.शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर ,राजु पाटील शिंपाळकर ,बालाजी पाटील नागणीकर ,हाणमंत पा.वाडेकर ,साहेबराव पा.हारनाळीकर ,केदार पा.ढगे,जेजेराव पा.डोणगावकर ,पांडुरग पा.रामपुरे, संतोष पाटील खतगावकर ,गुलाबराव नरवाडे,श्रिनिवास पा.दगडापुरकर,दत्ता पा.जाधव, संतोष पा.आगळे ,बालाजी सिध्दापुरे ,बालाजी पा.दुगावकर,अविनाश पत्के माचनुरकर ,आनंदराव भोसले,संजय भोसले,माधव पा.डाकोरे ,अजित पाटील तळणीकर, शंकर पा.हारनाळीकर ,गणपतराव पा.दौलापुरकर,दिपक शिंदे केसराळीकर,आशोक पा.गंजगावकर ,सुनिल नरवाडे,साहेबराव मुर्खे,श्रिनिवास मुर्खे,किरण टेकाळे,यांच्यासह विविध राजकीय पक्ष ,संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.