पत्रकारांच्या हिताविषयी जाण, यातच आमचे समाधान – चंद्रशेखर गायकवाड
नांदेड;
महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना यांच्या वतीने (दि.१४ सप्टेंबर) सोमवार रोजी नांदेड जिल्ह्यात पत्रकारांचे कोरोनामुळे हाल अपेष्टा होऊ नयेत या विषयाचा विचार करून शहरात मंगल कार्यालय,हॉल तत्सम काही ठिकाणी कोविड केअर सेन्टर व हॉस्पिटल निर्मिती करण्यात यावी,शहरात कोरोना बाधेच्या विळख्यापासून पत्रकार बांधवही सुटले नाहीत,त्यांच्यासमवेत कुटुंबीय सुद्धा संक्रमणाच्या विळख्यात अडकले जात आहेत,याचा विचार करून पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेन्टर निर्मिती करण्यात यावी,व महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे मृत झालेल्या पत्रकार यांच्या कुटुंबियांना कोविड-19 काळात मंजूर करण्यात आलेले ५० लाख रुपयांची तात्काळ मदत देण्यात यावी..
अश्या मागणीचे निवेदन नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे मॅडम यांना देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर गायकवाड साहेब,प्रदेश कार्याध्यक्ष मारुती गवळी,प्रदेश संघटक गजानन जोशी,जिल्हाध्यक्ष कृष्णा जोमगावकर,कार्याध्यक्ष दिलीप शिंदे,अविनाश हंबर्डे व जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी उपस्थित होते.