लोकनेते माजी खा चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा विठ्ठल कागणे यांचे करिअर मार्गदर्शन

 

कंधार ; शांतिदूत प्रतिष्ठान कंधार च्या वतीने माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे दिनांक २७ जुलै रोजी स्वामी विवेकानंद करियर अकॅडमी परभणीचे संचालक प्रा.विठ्ठल कागणे यांचे करिअर मार्गदर्शन व विविध क्षेत्रांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शांतिदूत प्रतिष्ठान कंधार च्या वतीने विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षकांचा सत्कार ,सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे कार्यक्रम घेतले जातात त्याच अनुषंगाने नांदेड लोकसभेचे माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण विद्यार्थ्यांकरिता तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे तसेच त्या कार्यक्रमावेळी विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे,उपस्थित गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिली जाणार आहे , दि. २७ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वाजता श्री संत नामदेव महाराज मंगल कार्यालय बस स्थानक कंधार या ठिकाणी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक प्रा. विठ्ठल कागणे यांचे मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान शांतिदूत प्रतिष्ठान कंधार च्या वतीने करण्यात आले आहे..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *