नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 27 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या नियोजनात हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात स्वाभिमान जागृत ठेवणारे स्वाभिमानी नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दिनांक 27 जुलै रोजी याही वर्षी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने सकाळी मरळक येथील महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी वृक्ष लागवड ही करण्यात येणार आहे.
यावेळी सुनील कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर सुमन बालगृहातील मुलींसाठी जेवणाची पंगत ठेवण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता कला मंदिर भागातील स्वामी समर्थ मंदिरात महाआरती आणि त्यानंतर सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे रुग्णांना अन्नदान करण्यात येणार आहे . आयोजित कार्यक्रमाला शिवप्रेमी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.