सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी लढा दिला. समाजातील शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 03 ऑगस्ट 2024 रोजी. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
सोनू दरेगावकर, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, पांडुरंग पिसाळ, राजीव माने, महेश इंगेवाड, पांडुरंग निंबाळकर, बालाजी ससाणे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.