(मुखेड : दादाराव आगलावे )
राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाईलाज असतो. राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचारी हे येत्या विधानसभेच्या कामकाजावर व विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून सदरील बहिष्कार
मध्ये मराठवाड्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान नगरपालिका-नगरपंचायत मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देऊन केले आहे.
राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच वर्षापासून शासन स्तरावर मागण्या प्रलंबित असून शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री व प्रधान सचिव आयुक्त यांच्या स्तरावर बैठकाची घेऊन मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत ही कर्मचाऱ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे. राज्यातील नगरपालिका नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण प्रणाली तत्त्वानुसार नगर विकास विभागाचे प्रणाली द्वारे 100% वेतन कोषागार मार्फत देणे, राज्यातील नगरपंचायतीमधील राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट सरसकट समावेश करणे आदीसह 20 मागण्या आहेत. सदरील मागण्या संदर्भात शासस्तरावर दिनांक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मधील कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजावर तसेच विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल तदनंतर त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील अशी निवेदनात मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे यांच्यासह राज्य संघटनेतर्फे केली आहे. या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुरेश पोस्तांडेल कार्याध्यक्ष रामेश्वर वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष गिरीश डुबेवार , प्रदेश सरचिटणीस अनिल पवार, कोषाध्यक्ष लालू सोनकांबळे, संघटक विजय गोडसे, विश्वनाथ घुगे, प्रमुख मार्गदर्शक धर्मा खिल्लारे सल्लागार दीपक रोडे, कार्यालय प्रमुख देवराम मुके, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.