या वर्षी तेविसावी व चोविसावी अमरनाथ यात्रा तसेच पंधरावी व सोळावी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ शनिवार दि.३ आगष्ट रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी, नांदेड येथे महाप्रसाद ठेवण्यात आले आहे. यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा मधील अन्नदात्यांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
गेल्या २३ वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्यानंतर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. यावर्षी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन जथ्यामध्ये १९३ यात्रेकरूंनी अवघड असलेली अमरनाथ यात्रा पूर्ण केली. राजेशसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १०९ यात्रेकरूंची चारोधाम यात्रा पूर्ण झाली.२४ वर्षात शेकडो भाविकांचे माफक दरात तीर्थाटन झाले. दिलीप ठाकूर यांनी विक्रमी तब्बल २४ वेळा अमरनाथचे,२७ वेळा वैष्णोदेवीचे आणि २९ वेळा अमृतसर येथील सुवर्णंमंदिराचे दर्शन घेतले आहे.तेविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,केदारमल मालपाणी,अकोल्याचे खत्री परिवार,रेखा भताने,श्याम हुरणे,नारायण गवळी,गोरखनाथ सोनवणे, वंदना सुरेश त्रिमुखे,डॉ.हिवरेकर ,डॉ.नखाते,मधुकर पास्टे, आशुतोष मुखाडे यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.
९० यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ्यामध्ये स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद ,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर,द्वारकादास अग्रवाल, जगन्नाथ सोनवणे,भोपाळचे दिलीप ठाकूर यांचे होणारे व्याही प्रतापसिंह ठाकूर, चंद्रकांत कदम,श्रीपतराव नेवळे पाटील,सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार,श्रीहरी कुलकर्णी,रामेश्वर वाघमारे,प्रकाश शिंदे,डॉ. प्रिया त्रिमुखे, गणपतसिंह ठाकूर, ,अमोल गोले,आनंद साताळे, अमर शिखरे पाटील यांचा समावेश आहे.वर्षातील ३६५ दिवस अखंडितपणे सुरू असलेल्या भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा मध्ये अनेकजण अन्नदान करतात. तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळोवेळी यात्रेची विस्तृत माहिती दिल्यामुळे काळजीत असलेल्या आप्तस्वकीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे अन्नदाते व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी जास्तीत भाविकांनी येऊन महाप्रसादाचे ग्रहण करावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.