सुर्यभान तेलंग यांचा गौरव

 

अहमदपूर ( प्रतिनिधी ) फुलवळचे भुमि पुत्र आणि वसमत आगारातील बसचालक सुर्यभान तेलंग यांनी सलग 25 वर्षे विना अपघात सेवा केल्याबद्दल नुकताच त्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र म्हणजे ट्राफी आणि रोख 25 हजार रुपयाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अधिक माहिती अशी की ते फुलवळ ता कंधार येथील मुळ रहिवासी आहेत. त्यांनी वसमत आगारातील बसचालक ( बिल्ला क्रमांक 17455 ) म्हणून सलग 25 वर्षे विना अपघात सेवा दिली. ते दोन महिन्यांपूर्वी नियत वयोमानानुसार सेवावृत्त झाले आहेत.

दरम्यान दि 12 आॅगस्ट 24 रोजी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. त्यावेळी यंत्र अभियंता बिराजदार आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या शुभ हस्ते हा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे यशवंतराव मंगनाळे, विजयकुमार फुलवळकर,माधवराव सादलापुरे, तुकाराम तेलंग , शंकरराव गौंड आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी अभिनंदन केले आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *