कंधार
रक्षाबंधनाच्या निमीत्ताने रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा कंधार येथे आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, पर्यावरण/निसर्ग व माणुस यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनींनी स्व:त तयार केलेली राखी यावेळी झाडाला बांधत पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी अड गंगाप्रसाद यन्नावार, मुख्याध्यापक मुंडे एस जी, सहशिक्षक सुर्यवंशी आर एच, तिडके ई पी, होंडाळे आर आर, श्रीमती शेख वाय आय, श्रीमती मंजुषा यन्नावार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अड गंगाप्रसाद यन्नावार म्हणाले निसर्ग हा कायम आपले रक्षण करण्यासाठी सज्ज असतो, हवा, पाणी, अन्न व ईतर गरजा भागविण्यासाठी निसर्ग महत्वाचा घटक आहे ही जाणीव विद्यार्थ्यांना आहे यातूनच त्यांनी झाडाला राखी बांधत कृतज्ञता व्यक्त केली आहे ही बाब कौतुकास्पद आहे,
या उपक्रमात काजल बामणवाड, माहीन शेख, निता बामणवाड, योगेश्वरी टेंभुर्णेवार, आरती पवार, पुजा पवार, मुस्कान शेख या विद्यार्थ्यांनी सहभागी होत्या