पोलीस स्टेशन, कंधार मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न:  दोषांना नष्ट करून समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचे ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र, कंधार तर्फे ब्रह्माकुमारीज कंधार च्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांच्या वतीने आज दि.१९ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन, कंधार मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला . यावेळी पीएसआय इंद्राळे सर. एपीआय खजे सर . एपी आय लिंगे सर. आदी उपस्थित होते.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, कंधार तर्फे ब्रह्माकुमारीज कंधार च्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवतात , पोलीस हा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळे समाजातील सुव्यवस्था सुरळीत चालते. पोलिसांना 24 तास सेवेवर राहवे लागते. आपल्या कुटुंबापासून दूर राहून सण,वार असताना देखील पोलीस ड्युटी बजावतात परिणामतः त्यांना अनेक सण उत्सवाचा आनंद घेता येत नाहीत
अशा कार्याला विनम्र अभिवादन.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्योती बहेनजी, सतिश भाई, श्रीकांत भाई शंकर ढगे, गौरव, नंदिनी, कमल माता आवाळे, लता माता ठाकूर इत्यादींनी सहकार्य दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *