विधान परिषद आमदार अमित जी गोरखे यांचा फुलवळ येथे सत्कार,माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांचा पुढाकार

 

 

कंधार: प्रतिनिधी

विधान परिषदेचे आमदार अमित जी गोरखे यांनी फुलवळ येथे दि 23 ऑगस्ट रोजी माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ यांच्या भुजंग निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला .

यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद चे सन्माननीय आमदार आमीजी गोरखे तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर साहेबराव वाघमारे मंगलसांगवीकर तसेच फुलवळचे डॉक्टर राम नामदेवराव फुलवळे,गोविंदराव बसवंते, राम बसवंते,बुद्धाजी बसवंते,गंगाधर मोरे,संजय दूधकावडे, लक्ष्मण वाघमारे,संदीप मोरे, विलास मल्हारराव वाघमारे, फुलवाचे पोलीस पाटील इरबाजी देवकांबळे, संभाजी नवघरे ,उद्धव भुजंगा देवकांबळे,सोसायटीचे संचालक फुलवळ उपस्थित असलेले सखाराम पाटील लाडेकर फेटेवाले घोडजकर यांच्यासह मान्यवर अपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना फुलवळ चे माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे बोलताना म्हणाले की फुलवळ गाव वाडी तांडे अशी ओळख असलेले फुलवळ हे सर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जातो हा गाव विकासापासून वंचित असल्यामुळे निवेदनद्वारे विनंती करण्यात आली. पाणी पुरवठा, विधन विहर, पाण्याच्या टाक्या यासह विविध
विकास कामाचा निधी देण्यात यावा असे साहेबांना गावकऱ्यांच्या वतीने व समाजाच्या वतीने देण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *