कंधार ;
ऐतिहासिक मन्याड खोर्यातील कंधार नगरीत नामांकित आणि विविध शालेय उपक्रमात अग्रणी असलेली शाळा म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या मातृशाळेत आज दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी “गोपाळकला”दहीहंडी दिनाचे औचित्य साधून श्री भगवान श्रीकृष्णाने आपल्या बासुरीच्या सुमधुर आवाजावर पशू,पक्षी व गोपीका आणि गोकुळातील सर्वाच्या मनी गारुड घातले होते.
ती विशालकाय बासुरी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी हस्तकलेतून तयार करुन विद्यार्थ्यांना कार्यानुभवातून विविध शोभेच्या वस्तू त्या करण्याची प्रेरणा मिळावी या साठीच या मुरलीचे विमोचन मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर, उपप्राचार्य प्रा.मुरलीधरराव घोरबांड सर,उपमुख्याध्यापक सुरेश ईरलवाड सर,प्रभारी पर्यवेक्षक ऐनोद्दीन शेख सर,प्रा.अशोकराव वरपडे सर,प्रा.भगवानराव बामणेसर,
प्रा शरदराव शेट्टेसर,प्रा.मोरे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्करराव आकुलवाड सर,विज्ञान विभागाचे अझहर बेग, सुभाषराव माळी सर,संग्राम जाधव सर, बालाजी झुंजरवार सर,प्रकाश पवार सर शिवाजी पवार सर,शुभम अल्लडवाड सर,गजानन घोरबांड सर,वैभव कुरुडे सर,प्रा.विद्याताई फड मॅडम, संगीत शिक्षिका वडजे मॅडम, सौ.सुमन चिंतेवार/बोड्डेवार,अर्चना नाईक मॅडम अन् विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.उत्कृष्ट क्षणचित्रे अझहर बेग सर व गजानन घोरबांड सर यांनी टिपली आहेत.