निरागस कळ्या

एक सुंदर फोटो फेसबुकवर पाहिला आणि यावर लिहावं वाटलं.. त्या दोन मुलीना फक्त बाप्पा माहीत असेल पण ज्या जगात त्या इतक्या निखळ हसत आहेत ते जग कसं आहे याची पुसटशीही कल्पना नसेल आणि या वयात असूही नये.. त्यांनी फक्त भरभरुन हे क्षण जगावे कारण बाहेर असलेले नराधम बऱ्याचदा या कळ्या नीटशा उमलुही देत नाहीत कारण त्यांना त्या खुडायची घाई असते.. या मुलींसोबत असलेल्या गणरायाला त्यांना सतत हसताना पहायचे असेल ना मग उमलायच्या आत त्यांच्या पाकळ्या चुरडणाऱ्याना तो उशीरा का शिक्षा देतो ??.. जेव्हा भगवंताने ब्रह्माजीना सृष्टीची निर्मिती करायला सांगितली तेव्हा त्यांनी त्यांच्या अर्ध्या अंगातुन मनुची निर्मिती केली आणि अर्ध्या अंगातुन शतरुपाची निर्मिती केली म्हणजेच काय तर या मुला मुलीचे वेगळे आईबाबा नाहीतच ..

परमात्माच आई आणि तोच बाप मग ही विकृती आली कुठून ??..ही आली आपल्या वासनेतुन कारण उपभोग घेण्याच्या नादात आपण कळ्यानाच फुलं समजून खुडायला लागलो आणि कळ्या खुडताना त्या झाडाला काय वाटेल याचा विचारही मनात येत नाही.. गणपतीत बलात्कारावर अनेक पथनाट्य सादर होत असतात.. पथनाट्य पहायला व्यसनी लोक तिथे फिरत असतात त्यावेळी त्या नाट्यात त्यांना काय सांगायचय हे त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आणि तिथून घरी जाऊन किवा वाटेत कुठेही दिसेल तिथे या कळ्याना क्रूरपणे चिरडलं जातं.. त्या निष्पाप जीवाचा दोष असेल तर ते त्याचं कर्म असेल का ??आणि या क्रूरतेत मर्दान्गी दाखवणाऱ्याचं काय असेल ?? कालच पुण्यातुन एक फोन होता , मॅम बलात्कार का होतात यावर बोलायला तुम्ही आमच्या मंडळात याल का ??..

साक्षात भगवंताने जगण्याचे नियम घालून दिलेले असताना मी म्हणेन ती पुर्वदिशा समजणारे आपण यावर मी काय बोलावं आणि काय अवेअरनेस करावा हा प्रश्न मला पडला ..कारण विषय इतका मोठा आहे अर्ध्यातासात लेक्चरमधे मी यातील कुठल्या मुद्द्यांवर बोलावं ना.. गणपतीत हिडीस नाच पहाण्यात ज्यांना रस असतो , जिथे १०००० लोक एकावेळी उपस्थित असतात , जिथे लक्ष्मी उडवत पायदळी तुडवली जाते , जिथे स्टेजमागे पत्ते खेळले जातात , जिथे चोली के पिछे क्या है यावर ताल धरला जातो अशाच आपल्या या तरुण पिढीला आपण बलात्कारावर काय मार्गदर्शन करावे ?? जिथे पावित्र्य नाही तिथे सभ्यता कुठून असणार ??.. जिथे देवाच्या नावावर वाट्टेल ते खपवलं जातं तिथे भक्ती कुठे आहे ???.. काल कोणीतरी मुद्दाम माझ्या वॉलवर नॉनव्हेजचा फोटो टाकून त्यावर लिहीले होते मांसाहाराचा गणपतीला नैवेद्य दाखवून खाल्ला पहातो कोण काय करतं ??..त्या व्यक्तीची किव आली.. आम्ही कोण काय करणार बाबा तुझं ?? तो बसलाय की हिशोबाला..

एखादी गोष्ट आपल्या हातून चुकून होणं आणि माहीत असून ती करणं यात खुप फरक आहे.. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा राजे अशा सांगणाऱ्या जिजाऊ यांचीच आता वानवा आहे कारण त्या रमल्या आहेत सोशल मिडीयावर.. संध्याकाळी दिवेलागणीला त्या मित्रासोबत डेट करण्यात मग्न आहेत. शाळा कॉलेजचे मित्र पुन्हा भेटल्याने त्या नाचगाण्यात आणि जुन्या अर्धवट राहिलेल्या प्रेमप्रकरणात मग्न आहेत मग त्यांना संस्कार करायला किवा जिजाऊ व्हायला वेळ कुठे आहे … श्रावण कधी संपतो आणि नॉनव्हेज आणि ड्रींक पार्टी कधी करतो याची वाट पहाणाऱ्याना आपल्या वयात आलेल्या मुलांना लैगिकतेचं ज्ञान द्यायला वेळच नाही.. मग मार्गदर्शनाची गरज नक्की कोणाला आहे ??.. पालकांना कि मुलांना ??..

 

बलात्कार हा एक मुद्दा झाला असे हजारो मुद्दे आपल्या समोर आहेत..बलात्कार झाल्यावर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा मुला मुलीना त्यांच्या अवयवाबद्द्ल माहीती देणं गरजेचं आहे , वयात येताना त्यांच्यात होणारे मानसिक , शारीरिक बदल याबद्दल अवेअरनेस देणं असेल , त्या वयात आकर्षण का वाटतं यावर चर्चा असेल.. प्रेम म्हणजे काय , शारीरिक संबंध म्हणजे नक्की काय , नाती म्हणजे काय .. फ्रेंडशिप म्हणजे काय.. मुलाने मुलीकडे कसं पहावं.. घरातील नाती कशी आहेत त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.. बऱ्याच पालकांना वाटतं , आपण पैसे आणले म्हणजे झालं पण त्या पैशासोबत विचार किती महत्वाचे आहेत हे कोण समजवणार ?? ..

 

 

कारण आजी आजोबा सुध्दा सोशल मिडीयावर जुन्या प्रेमाला शोधत आहेत.. जिथे सगळच फाटत चाललय तिथे ठिगळ कशाकशाला लावणार ?? विभक्त कुटुंब पध्दतीने आपला बळी घेतला आहे.. घराला किचन नको ह्या पाश्चात्य संस्कृतीने ओबेसीटी सारखा राक्षस आला.. वाचक नसल्याने अनेक लायब्रऱ्या बंद अशी कुठेतरी न्युज वाचली आणि खंत वाटली.. तरूण पिढी सिगरेटचे झुरके मारत रस्त्यावर दिमाखात फिरत असते कारण आई बाबा दोघेही घाराबाहेर.. त्यांच्यावर लक्ष ठेवणारे आजी आजोबा वृध्दाश्रमात आहेत आपण वाढवलेल्या भरमसाठ गरजा यांनी आपलाच बळी जातोय.. टॉवर च्या जाळ्यात ना उन्ह , ना वारं , ना पक्षांचा आवाज फक्त भिंतीच्या आतमधे रोज अशृ वहातात ते बलात्काराचे आणि एकाकीपणाचे.. बलात्कार हा फक्त शारीरिकच नसतो तर मानसिक बलात्कार हा सगळ्यात जीवघेणा असतो.. बलात्कारावर मार्गदर्शन करण्यापेक्षा त्याच्या मुळावर काम करायची सुरुवात ही फक्त आपल्या घरापासूनच होवु शकते.. संवाद वाढवा.. घरी येणं जाणं वाढवा.. व्यक्त व्हा.. मोठ्याचा आदर करा.. पदोपदी कृतज्ञता व्यक्त करा.. बलात्कार ही त्यावेळी केलेली कृती असली तरीही करणाऱ्याच्या मनात विष कालवण्याची विकृती ही सगळ्यात घातक म्हणुन योग्य व्यक्तीच्या सानिध्यात राहायला शिका..
कळ्याना नैसर्गिकपणे उमलु देणं हेच माणूसकीचं लक्षण आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा….
#SonalSachinGodbole

 

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *