अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक

सोलापूर :

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार केंद्रीय महासचिव कॉ. सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांवर खोटे आरोप केले.‌ शिवाय दिल्ली दंगल प्रकरणात नाव गोवले आणि दोषारोपपत्र दाखल केले याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ यावेळी काळे झेंडे, काळ्या फिती लावून अमित शहा व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.


यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली खोटे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कॉ. सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांची नावे दोषारोपपत्रातून काढावीत अशी मागणी यावेळी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *