नांदेड राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्ना संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नांदेडच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांची नांदेड येथील विश्रामगृहावर भेट घेवुन प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली* *आज राज्याच्या शिक्षण मंत्री नांदेड दौऱ्यावर आल्या असता राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.राज्यातील अनेक वर्षापासून शिक्षकांची विविध प्रश्न प्रलंबित आहेत विशेषतः* *1️⃣राज्यातील जि.प अंतर्गत कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित 10-20-30प्रगत योजना लागू करावी ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली.त्याचबरोबर* *2️⃣ 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.* *3️⃣1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती नैसर्गिक मृत्यू झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत करावी.* *4️⃣राज्यातील सर्व शिक्षकांना विमा योजना लागु करावी.* *5️⃣covid-19 मध्ये कर्तव्य बजावत असताना ज्या शिक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसास तातडीने 50 लाख रुपये विमा संरक्षण मिळावे.* *6️⃣जिल्हा परिषद शाळेची विद्युत देयके राज्य शासनाने भरावीत* *7️⃣मुख्यालयी राहणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 09/09/19 परिपत्रक रद्द करण्यात यावे.* *8️⃣ग्रामसभा घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला देई पर्यंत नांदेड जिल्ह्यातील शिक्षकाना जून 2020 पासून थकलेले वेतन तात्काळ अदा करा.* *9️⃣जिल्हा गुरुगौरव प्राप्त शिक्षकांना देण्यात आलेल्या वेतनवाढी सेवानिवृत्तीनंतर वसूल करण्यात येऊ नयेत.2008 नंतर राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ज्यादा वेतनवाढी पूर्ववत देण्यात याव्यात* *राज्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील मुख्याध्यापक राजपत्रित वर्ग-2 ची पदे राजपत्रित मुख्याध्यापक वर्ग 3 मधे रूपांतरित करण्यात येऊ नये. राज्यातील रिक्त असलेली राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत.* *1️⃣1️⃣राज्यातील पात्र विषय शिक्षकांना तात्काळ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी ,यासह इतरही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.* *तसेच या भेटीचे औचित्य साधुन नांदेड जिल्हा माहिला आघाडी कार्यवाह उषाताई नळगीरे लिखीत मैत्री हे काव्य संग्रहाचे मा.मंत्री महोदयांना भेट देण्यात आले* *शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळामधे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,शिक्षक नेते संभाजी आलेवाड,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,दिगंबर पाटील कुरे, बालाजी पांपटवार,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माधवी पांचाळ उषाताई नळगिरे,वर्षा भोळे,सारिका आचमे,बाबुराव जाधव,संजय मोरे,संतोष देशमुख सुनिल मुतेपवार इत्यादी उपस्थित होते* Attachments a |