श्री ची आरती आणि प्रसाद वाटप

 

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील नागेश काॅलनीतील अष्टविनायक गणेश मंडळातर्फे स्थापित श्री ची आरती आणि प्रसाद वाटप नगर सेवक रवी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवार दि 13 सप्टें 24 रोजी रात्री आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले. या गणेश मंडळाचे हे 12 वे वर्षं आहे.

परंपरा खंडित करण्यापेक्षा यावर्षी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी एकत्र येऊन , पुढाकार घेऊन श्री ची स्थापना केली आहे. सार्थक क्र तुपकर हा मंडळाचा अध्यक्ष आहे. ओम वै चौधरी हा उपाध्यक्ष आहे.कल्याण शिंदे सचिव आहे. आडे महाराज सकाळ संध्याकाळ आरती करत आहेत.दिपक ढाकणे, देविदास गीत्ते आणि योगीराज ढाकणे मंडळास सहकार्य करत आहेत. दरम्यान आज रविवार दि 150 सप्टें 24 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आरती आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *