कंधार :येथील विधी महाविद्यालयाच्या मैदानात शनिवारी तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४,१७ आणि १९ वयोगटाखालील कबड्डी स्पर्धा पार पडल्या. सकाळी ११ :०० वाजता उत्साही वातावरणात सुरू करण्यात आलेल्या स्पर्धेला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला.
पर्यवेक्षक प्रदीप गरुडकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मनीषाताई धोंडगे, तालुका क्रीडा संयोजक प्रा. शिवराज चिवडे, प्रा. सुभाष वाघमारे, प्रा. सूर्यकांत जोंधळे, ज्ञानेश्वर गडपल्लेवार, प्रा. माधव ब्याळे, प्रा. राजेश गंजेवार, क्रीडा शिक्षक प्रा. संतोष चव्हाण, प्रा. अच्युत होळगे, प्रा. घोरबांड, जितेंद्र ढगे, विक्की यन्नावार, शिवाजी बळवंते आदी उपस्थित होते.
१४ वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कंधार येथील छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूलने बाजी मारत विजेतेपद पटकावले. १७ वयोगटातील स्पर्धेत जि. प. हा. बाचोटी शाळेतील मुलींनी अजिंक्यपद पटकावले. १९ वयोगटातील स्पर्धेत बाचोटी महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला.
१४ वयोगटाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत बिजेवाडी येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. १७ वयो गटातील स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळा गांधीनगर येथील मुलांनी बाजी मारली. १९ वायोगटाखालील मुलांच्या स्पर्धेत गांधीनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेने विजेतेपद पटकावले. श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला.