कंधार : प्रतिनिधी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन राजे संभाजी प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना आयडियल मॅन ऑफ द इयर अवार्ड देऊन सन्मानित केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ लोहा/कंधार तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी,तांडा व शहरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या डोळ्याचे शिबिर आयोजित करुन मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार करून अंधमुक्तीचा संकल्प केला. तीन हजार लोकांच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रियेचा पहिला टप्यात पार पडला. प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन “आयडियल मॅन ऑफ दि इयर” हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. नांदेड येथील केआरएम महिला महाविद्यालय सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कोरोना काळात कंधार व लोहा तालुक्यातील सरकारी आणि खासगी डॉक्टरांना पिपीई किटची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ”भाऊचा डब्बा ” हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासली. गेल्या तीन वर्षापासून “भाऊचा डब्बा” हा उपक्रम अविरत सुरू आहे. कोरोना आजाराने जीव गमावलेल्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.कंधार व लोहा तालुक्यातील ३ हजार वयोवृद्धावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. या सर्व बाबींची दखल घेऊन राजे संभाजी प्रतिष्ठानच्यावतीने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कंधार लोहा तालुक्यात कौतुक होत आहे.