मुखेड: येथील छत्रपती गणेश मंडळ दीपनगर च्या वतीने शाहिर अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालयाचे दलीत वर्ग संघ विद्यार्थी वस्तीगृहातील सत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 1यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील सचिन मेनकुदळे प्रा. डॉ.शंकर सकनुरे, बळवंत जाधव, ओम गोंड, जाधव के. एस., वस्तीगृहाचे व्यवस्थापक वैभव गायकवाड वस्तीगृह आधिक्षक सुरेश कोदरे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात साहित्यिक संतोष तळेगावे म्हणाले की, गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे ठरले व हा कार्यक्रम योग्य रीतीने संपन्न झाला. यावेळी सर्वांचे आभार सचिन मेनकुदळे यांनी मानले.
यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष सचिन मेनकुदळे, सचिव प्रा. डॉ. शंकर सकनुरे, कोषाध्यक्ष संतोष तळेगाव, वैभव इंगळे, प्रमोद देवकर, विकास जाधव, शुभम बेंद्रे, दयानंद क्षत्रिय, राजू गड्डमवार, अनिकेत पांचाळ, रितेश डुमणे, सुशांत देवकते, विशाल जाधव, सोहम भिसे, सौरभ भिसे यांच्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.