मुखेड: (दादाराव आगलावे)
चालु शैक्षणिक वर्षात मुखेडच्या दिपनगर व सरस्वती नगर मधील विविध क्षेत्रात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुखेड येथील सुप्रसिध्द रेडिओलाॉजिस्ट डॉ.श्रीहारी बुडगेमवार उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मणराव सकनुरे,आनंद सुर्यवंशी, सौ.विद्या देशमुख, प्रा.मारोती देशमुख, प्रा.चंद्रकांत साखरे, अंतेश्वर गंदीगुडे, रेवणनाथ पाटील, उमाकांत मुंडे, गुरुनाथ शिरशे, सौ.वसमते मॅडम, प्रताप कोल्हे, सौ.घोडके कमल,सौ.महानंदा वानखेडे या सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एकचित सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थ्यी शारदा पेंडलवाड, गौरव मोरे, प्रिती पडोळे, कृष्णा कवटिकवार, रुद्र टोम्पे, वेदीका सुर्यवंशी , सार्थक वडले, शशांक देशमुख, शिवराज सकनुरे याचा व नुकताच ज्यांना तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार मिळाले मारोती रुद्देवाड, किरणकुमार पडोळे, चंद्रकांत डावकरे, सौ. प्रगती डांगे, सौ.उर्मीला बन्नाळे यांचा डॉ.श्रीहारी बुडगेमवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सटवाजी मामिलवाड, प्रकाश चल्लावार, विठ्ठलराव इंगळे, श्यामसुंदर देशमुख, संतोष टाकळे, मारोती मुंडकर, अनंत देशमुख, अभिजीत देशपांडे, गोविंद हिवराळे, राजाराम जाधव, प्रमोद देवकर, प्रा.रावसाहेब पाटील, प्रा.अशोक सकनुरे, प्रा.गजानन गाडले, प्रा. मनोज साखरे, नागनाथ वजिरे, रत्नाकर मोरे व छत्रपती गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सॅमसंग यावेळी प्रास्ताविक करताना सचिन मेनकुदळे म्हणाले की प्राथमिक कर्ज सामाजिक बांधिलकीतून गणेश मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे म्हणजे लोकमान्य टिळकांना अभिवादन केल्यासारखे आहे कार्यक्रमाचे आभार साहित्यिक संतोष तळेगाव यांनी मांनले.या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद, पाटील उपाध्यक्ष सचिन मेनकुदळे, सचिव प्रा. डॉ. शंकर सकनुरे, कोषाध्यक्ष संतोष तळेगाव, वैभव इंगळे, प्रमोद देवकर, विकास जाधव, शुभम बेंद्रे ,दयानंद क्षत्रिय, राजू गड्डमवार,अनिकेत पांचाळ, रितेश डुमणे, सुशांत देवकते, विशाल जाधव, सोहम भिसे, सौरभ भिसे यांच्यासह गणेश मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम केले.