कंधार= प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे पानशेवडी येथील पूर्वीचे सरपंच सौ. गेनुबाई चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे कंधारचे तहसीलदार गोरे यांनी आदेश पारीत करत सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला, दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडळाधिकारी शेख एम. एन.व ग्रामसेवक बालाजी भायेगावे यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत कार्यालय पानशेवडी येथे विशेष बैठक घेण्यात आली, सरपंच पदासाठी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली.
यावेळी गेनुबाई चव्हाण, कचरूबाई मोरे, अॅड शिवाजी मोरे, चंद्रकांत मोरे, उषा बसवंते, नागीनबाई भालेराव, सुमित्रा नरवडे, हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्रीमती उज्वला मोरे ह्या आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्यां
सौ. आशाताई शिंदे यांचे कट्टर समर्थक कोंडीबा मोरे यांच्या त्या मातोश्री आहेत.यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच श्रीमती उज्वलाबाई मोरे म्हणाल्या की आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून पानशेवडी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कट्टीबंध असल्याचे सांगितले, यावेळी
मोरे यांच्या निवडीचे आमदार श्यामसुंदर शिंदे, सौ.आशाताई शिंदे,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे, आंबड चे तहसीलदार विजय चव्हाण,माजी सभापती ज्ञानेश्वर पा.चोंडे, भगवान पाटील मोरे, जळबा पाटील मोरे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.