छत्रपती गणेश मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 

 

मुखेड: येथील छत्रपती गणेश मंडळ दीपनगरच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्त्री रोग तज्ञ डॉ.विजयकुमार मोरे यांच्या हस्ते  झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक रेणुकादास देशमुख, एलआयसी एजंट देविदास देवकर यांची उपस्थिती होती.

या शिबिरात एकुण 32 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. उदगीर येथील राजधानी ब्लड बॅकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विनोद एकनाथ पाटील, उपाध्यक्ष मेनकुदळे, सचिव प्रा. डॉ. शंकर सकनुरे, मन्मथ देशमुख, साहित्यिक संतोष तळेगावे, बळवंत जाधव, प्रमोद जाधव, प्रमोद देवकर, वैभव इंगळे, शुभम बेंद्रे, अनिकेत जाधव, सुशांत देवकते, विशाल जाधव, रितेश डुमणे यांनी शिबिर यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *