श्री संत सावता माळी पुरुष बचत गटाची दुसरी बैठक संपन्न

 

 

अहमदपूर (प्रतिनिधी ) येथील श्री सावता माळी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव आरसुळे यांच्या निवासस्थानी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व सभासदांनी आपापले शेअर्स व मुद्दल सर्व जमा करून गटांना सहकार्य केले.

त्यातच एक अमृत योग म्हणजे आपल्या माळी समाजातील एक नामवंत कीर्तनकार भागवतकार राम कथाकार व चारधाम अयोध्या काशी रामेश्वर असे अनेक तीर्थक्षेत्रांसाठी यात्रेचे नियोजन करणारे नामदेवराव राउत महाराज हे गटाला व सर्व सभासदांना हितगुज करण्यासाठी निवासस्थानी भेटीला आले होते.

त्यांचे पण साहेबांनी सत्कार केला व त्यानी अनेक विषयावर मार्गदर्शन केले .तरी सर्व सभासदांना महिन्यातून एक वेळेस या बचत गटाला हजेरी लावावी ही माझी वैयक्तिक व अध्यक्षांची विनंती आहे. असं आवाहन बाबुराव आरसुडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *