इथे मनाची साफसफाई करुन मिळेल.

अगदी कालच गणपती गेले आणि आता स्त्रीयांना वेध लागतील ते नवरात्र आणि दिवाळी साफसफाईचे… घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाकणं , घराला रंगरंगोटी करणं , डबे धुणं असेल किवा काय कपडे घ्यायचे किवा दागिने खरेदी असेल या सगळ्याचं प्लॅनिंग आपण दरवर्षी न चुकता करतो.. बोनसची वाट पहातो अशा एक ना हजार गोष्टी करतो पण आपण मनाची साफसफाई करतो का ??.. जी सगळ्यात महत्वाची आहे त्यावर आपण कामच करत नाही.. सध्या मी वाचन आणि हरीनाम यावर लक्ष केंद्रीत केलय.. मनाचे श्लोक , भगवद्गीता श्लोक यावर लक्ष केंद्रीत करत आहे आणि हे करत असताना मला माझ्यातील दोन/ तीन त्रूटी जाणवल्या आणि जोपर्यंत मी त्यावर काम करत नाही तोपर्यंत मला इच्छित स्थळी पोचता येणार नाही हे माझ्या लक्षात आलं..
सगळ्यात आधी आपण चुकतोय हे आपल्या लक्षात यायला हवं आणि ते माझ्या अनेकदा आलं पण आता यावर प्रकर्षाने काम करायची गरज जाणवली.. कारण होतं , माझी प्रगती आणि त्यातून मला घडवणं .. माझा स्वभाव किवा विचार कितीही चांगले असले तरीही ते दुसऱ्यावर आपण लादायला नको म्हणजेच काय मला समाजसेवेची आवड आहे म्हणुन समोरच्याला ती असायला हवी हा अट्टाहास मी करायला नको.. मला माणसं आवडतात म्हणुन ती सगळ्याना आवडावीत ही जबरदस्ती असायला नको.. मी घरी बोलावून चार लोकांना खाऊ घातलं तर त्यांनीही तसच करावं हा विचार नक्कीच चांगला आहे पण अपेक्षा चुकीची आहे .. आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो.. समोरचा फुकट मिळालेलं खाऊन निर्लज्जपणे निघूनही गेलेला असतो.. म्हणजेच काय तर आपल्या चांगल्या असलेल्या गोष्टीचा फायदा हा आपल्याला होणार आहेच मग समोरच्याला तो मिळावा यासाठी मी आटापिटा करु नये खरं तर किती सहज विचार आहे पण आपण दुखी होतो कारण असतं अपेक्षा.. सगळ्यात मोठा लोचा हा इथे होतो.. लेट गो करता यायला हवं असेल तर मनाची आणि विचारांची साफसफाई व्हायलाच हवी ना.. संतानी हरीनाम घेउन आपली प्रगती करायला सांगितली असताना आपण भौतिक नात्यात का गुंतून पडतो हा प्रश्न मला पुन्हा नव्याने पडला आणि त्यानुसार मी माझ्या विचारांची दिशा बदलली आणि कचरा बाजूला करायला सुरुवात केली.. आपली कमतरता आपल्यालाच माहीत असते आणि कोणात किती अडकायचं हेही आपल्याच हातात आहे.. डीटॅचमेंट हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि तो येतो उत्तम विचारानी.. जसजशी आपण अध्यात्मात प्रगती करतो तसतसे आपण वरकरणी दिखाऊ प्रेमापासुन दुर व्हायला लागतो आणि भगवंताशी जोडले जातो.. योग याचा अर्थ जोडले जाणे असाच आहे.. उशीर होण्यापेक्षा वेळेवर लक्षात येत असेल तर त्यावेळी तिथेच आपल्याला थांबताही यायला हवं ना .. घराची साफसफाई आपण माणसे लावून करुन घेउ शकतो पण मनाची सफाई स्वतः स्वतःची करावी लागते.. मानसशास्त्रज्ञ फक्त मार्ग दाखवु शकतो तो सफाई करुन देउ शकत नाही मग हे टायटल चुकीचे आहे … हो चुकीचच आहे कारण ही दुनियाच खोट्याच्या आधारावर चालते कारण खरी व्यक्ती कोणालाच आवडत नाही पण नाराज व्हायचं नाही कारण ती भगवंताला आवडते.. म्हणुन सतत त्याच्या स्मरणात राहून प्रगती केली तर दुख नाहीच फक्त आनंद.. मनाच्या श्लोकांचा माझ्यावर इतका चांगला इंपॅक्ट होइल असं वाटलं नव्हतं.. तुम्हाला वाटत असेल तुम्ही चुकत आहात तर दिवाळी दसऱ्याची वाट पाहू नका.. आता ताबडतोब याचक्षणी स्वच्छतेला लागा..

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *