जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत सेवादास विद्यालयाचे यश

मुखेड: 19 वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर (को.) येथील संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेचप्रतीक्षा मारोती बोईनवाड, साक्षी नागनाथ चव्हाण अर्चरी या क्रीडा प्रकारात राजस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा प्राचार्य गंगाधरराव राठोड साहेब, मुखेड-कंधार चे लोकप्रिय आमदार डाॅ.तुषार गोविंदराव राठोड साहेब, उप-प्राचार्य डाॅ.विजयकुमार जाधव, उप-मुख्याध्यापिका प्रेमला स्वामी, पर्यवेक्षक सुभाष राठोड, क्रिडा विभाग प्रमुख प्रा.बाबुराव गंदपवाड, संस्कृतिक विभाग प्रमुख भारत जायभाये वर्ताळकर, मार्गदर्शक प्रा. बाबू गंदपवाड, शिवाजी जाधव, शेषराव वडजे, जगदीश आंबूलगेकर, एस. जी.
नातेवार यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सत्काराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती विभाग प्रमुख भारत गुरुजी जायभाये यांनी केले तर पर्यवेक्षक सुभाष राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *