दिग्रस बु. येथे गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाचे अनावरण भव्य स्वरूपात कंधार मुखेड मतदार संघाचे आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते दि. 22 सप्टेंबर रविवारी करण्यात आले. मारोती गवळे आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून भव्य अश्वारूढ स्मारक साकारले असून गावातील शिवस्मारक समितीने हे काम पूर्णत्वास नेले आहे. गावातील तसेच परगावातील शिवप्रेमिनी या स्मारकासाठी आर्थिक सहकार्य केले.
या अनावरण सोहळ्यासाठी गावातील सर्व समाज बांधव तसेच पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विद्युत रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी कोल्हापूरचे या. खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नसल्याची खंत आणि या दिमाखदार सोहळ्यासाठी शुभेच्छा पत्र पाठवून दिल्या.या सोहळ्याच्या निमित्ताने आमदार तुषार राठोड म्हणाले की, राजा कसा असावा आणि त्यांचे जीवन आणि कार्य आजही या समाजाला दिशादर्शक ठरत आहे , अशा छत्रपती शिवरायांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन रयतेचे ,स्वाभिमानाचे स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून आपण आपल्या राज्याचा आणि देशाचा स्वाभिमा बाळगायला शिकले पाहिजे. सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र नांदले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या अनावरण सोहळ्या प्रसंगी मारोती गवळे यांनी छत्रपती शिवरायांचे कार्य ,आत्ताचा समाज आणि शिवकालीन समाज यांचे चित्र स्पष्ट केले.शिवरायांकडून आपण त्याग , निष्ठा , स्वाभिमान , परिश्रम आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भुमिका यासारखी अनेक मूल्ये आपण घ्यायला हवी असे प्रतिपादन केले. तसेच या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुणे उपस्थित असलेल्या, सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.पुढाकार घेऊन काम पुर्णत्वास नेले म्हणून मारोती गवळे यांच्या कार्याचा गौरव द्वार आमदार तुषार राठोड यांनी त्यांचा सत्कार करुन सन्मान केला.
या अनावरण सोहळ्यासाठी मारोती गवळे यांच्या नेतृत्वातील शिवस्मारक समितीने पुढाकार घेतला.
या अनावरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे -माधवराव देवसरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष , चित्राताई गोरे,बाबुराव गिरे,बळीराम पाटील पवार ,नितीन कोकाटे म्हणून उपस्थित होते तसेच खुशाल राव पाटील उमरदरीकर , लक्ष्मण पाटील खैरकेकर ,मनोज गोंड , बाबुराव गिरे , गंगाप्रसाद यन्नावर, बालाजी सकनुरकर, बळीराम पवार, भिमराव जायभाये, भगवान शिंदे, देविदास कारभारी, मारोती कल्याणकर, मारोती पांढरे, नामदेव कुट्टे, यादव चिवडे, भास्कर भगनुरे, तानाजी वळसंगे, गणपत सोनकांबळे, नामदेव चोंडे , भिमराव आराळे, भिमा यादव, शिवाजी जाधव, भरत गुट्टे , खुशाल राजे , संभाजी वाडेकर, राजू मुकनर, सतिश नळगे, सुनिल हराळे इ. मान्यवर उपस्थित होते .या अनावरण सोहळ्याचे अध्यक्षपद मा. सरपंच अप्पाराव पाटील यांनी भुषविले. या सोहळ्यासाठी गावचे सरपंच दिक्षा कांबळे, उपसरपंच शंकरराव पाटील,मा. उपसरपंच विश्वांभर पाटील, ग्राम पंचायतीचे आजी माजी सदस्य , नंदकुमार ठाकूर, संजय सिंह ठाकुर, पोलिस पाटील जोगपेठे, पंडित भुरे , लालबा शिंदे , सुनिल चिद्रावार ,शंकरराव कांबळे, प्रा. जयवंत यानभुरे, मेहबूब शेख, संदिप कांबळे अंतेश्वर कांबळे, तसेच शिवस्मारक स्मारक समितीतील सुजित गोरे, कैलास शिंदे, संदिप केंद्रे, राम वडजे, कृष्णा बनसोडे, तानाजी बनसोडे, धनराज भुरे , माधव कांबळे, रघुवीर वडजे, किरण वडजे, साईनाथ शिंदे, श्रीराम वडजे, नर्सिंग वडजे , सदाशिव मुंडे, मनोहर भुरे, नर्सिंग तेलंग, साईनाथ चिद्रावार, लक्ष्मण गवळे, दत्ता भाजिपाले, व्यंकट नावंदे, गोविंद सोनटक्के, धनराज होनराव, मारोती वडजे,अनुराग बोरा, जयराम शिंदे, दत्ता शिंदे, दत्ता वडजे, बालाजी शिंदे, सचिन शिंदे, बालाजी बनसोडे, कृष्णा मुंडे, हनुमंत मुंडे, भरत गिते, सुरज गित्ते, सचिन गित्ते, ज्ञानेश्वर मुंडे , फिरोज बागवान बाळू भुरे ,अनिल राठोड, रामानंद मॅनेवार, मनोज सातेगावे सर्वच सदस्य आणि गावातील ग्रामस्थ , महिला , लहान थोर उपस्थित होते. शिवरायांच्या नामघोषाने आणि जयजयकाराने संपूर्ण दिग्रस बु.आणि परिसर निनादून गेला होता.
सतिश यानभुरे
8605452272